
PHOENIX NEWS
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना फिनिक्स अकॅडमीमध्ये श्रद्धांजली अर्पण-
अहमदनगर- वर्का ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट च्या अरणगाव येथील फिनिक्स अकॅडमीमध्ये 1 रोजी स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली. याप्रसंगी शाळेतील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत टिळक यांच्या आठवणींना उजाळा दिला.
टिळक हे लोकनायक घडण्यामागचे कारण म्हणजे, त्यांचे प्रभावी व्यक्तित्व. सर्वांनीच त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मिताली बाजपेयी यांनी केले.
Date: 3/08/2019

PHOENIX NEWS
फिनिक्स अँँकँडमीचा पृथ्वीराज राज्यात प्रथम
वाळकी।प्रतिनीधी
गामा अँबँकस केरला यांनी मराठा मंदिर मंगल कार्यालय, औरंगाबाद येथे राज्य पातळीवर अँबँकस स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता ज्यामध्ये फिनिक्स अँकँडमी अरणगाव येथील इयत्ता सातवीच्या पृथ्वीराज संतोष कोतकर याने राज्यात प्रथम क्रमांक पटकवला. मानचिन्ह तसेच मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मिताली बाजपेयी पृथ्वीराज याचे अभिनंदन करत त्याच्या पुढील वाटचालींसाठी अनेक शुभेच्छा दिल्या
Date: 1/07/2019

PHOENIX NEWS
फिनिक्स च्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी.
वाळकी | प्रतिनिधी
अधिक माहितीनुसार वर्का ग्रुप ऑफ एज्युकेशनस ची अरणगाव येथे फिनिक्स अकॅडमी ही शाळा कार्यरत आहे. शुक्रवार दिनांक २८/०६/१९ रोजी "राष्ट्रीय आरोग्य मिशन महाराष्ट्र" अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉ. शेख तसेच डॉ. सोनवणे यांनी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. "आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक असतात जे समाज घडवतात आणि ते निरोगी असावे हा यामागील उद्देश आहे." असे प्रतिपादन शाळेचे प्राचार्या सौ. मिताली बाजपेयी यांनी केले.
फोटोत विद्यार्थ्यांची तपासणी करताना डॉ. शेख आणि डॉ. सोनवणे.
Date: २८/०६/१९

PHOENIX NEWS
फिनिक्स अँकँडमी येथे "जागतिक योग दिवस" उत्साहात साजरा.
वाळकी । प्रतिनिधी
वर्का चरिटेबल ट्रस्टच्या फिनिक्स अँकँडमी, अरणगाव येथे शुक्रवार दिनांक २१/०६/१९ रोजी "जागतिक योग दिवस" उत्साहात साजरा करण्यात आला. ह्या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजवण्यात आले. शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करवण्यात आली. तसेच त्यांचा शरीरावरील परिणाम समजवण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधतांना शाळेचे प्राचार्या सौ. मिताली बाजपेयी यांनी सांगितले की "योग ही अशी विधी आहे, जिच्यामुळे मनुष्य दिर्घायुषी होतो. नियमित योगासने केल्याने आपले शारिरीक स्वास्थ्य उत्तम राहते व मरणोत्तर आपण आपली शारिरीक अवयवे गरजुंना देऊ शकतो. मानवास निसर्गाने दिलेल्या अनेक वरदानांंपैकी स्वस्थ शरीर हे सर्वोत्तम आहे. त्यामुळे ते स्वस्थ ठेवणे आपले कर्तव्य आहे, योगासने आपणास ह्या कार्यात सहाय्य करतात."
प्रसन्न वातावरणात योगासने केल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.